जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील मुंबई हैदराबाद महामार्गावरील नंदेश्वर हायटेक नर्सरी व रेणुके परिवार यांच्या वतीने स्वातंत्र्य दिना दिवशी जळकोट येथील तीन शाळांमध्ये प्रत्येकी पाच झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशाला, जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा या तिन्ही शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आनंदेश्वर नर्सरी च्या वतीने प्रत्येकी पाच झाडाचे वृक्षारोपण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी आनंदेश्वर नर्सरीचे अमोल इगवे व रेणुके परिवार, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका टोनपे, कन्या शाळेचे मुख्याध्यापक महादेव राठोड, प्राथमिक मुलांचे शाळा मुख्याध्यापक शिंदे, सहशिक्षक सुरवसे, ढोबळे, गिरी, प्रेम लता कांबळे, पत्रकार संजय रेणुके, पत्रकार वीरभद्र पिसे, इलाही बागवान, संजय स्वामी, सर्व शाळांचे शिक्षक शिक्षिका, विद्यार्थिनी उपस्थित होते.