जळकोट, दि. १६ : मेघराज किलजे
सध्या पावसाळा सुरू आहे. या पावसात राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. संबंधित खात्याने हे खड्डे तात्काळ बुजवावेत. अशी मागणी करत युवा सेनेने राष्ट्रीय महामार्गावरील जळकोट गावावरील खड्ड्यांचे स्वातंत्र्य दिना दिवशी बेशरम व हार घालून पूजन केले.
सध्या मुंबई हैदराबाद महामार्ग सध्या खड्ड्यांच्या विळख्यात आहे. सध्या पाऊस पडत असल्याने हे खड्डे वाहनधारकांना दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे वरचेवर अपघात घडत आहेत. संबंधित खात्याचे लक्ष वेधण्यासाठी व तात्काळ खड्डे बुजवण्यासाठी युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख व जळकोट ग्रामपंचायत सदस्य ऍड. आशिष सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिना दिवशी खड्ड्यांचे बेशरम व पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. संबंधित खात्याने तात्काळ खड्डे बुजविण्याची मागणी केली. अन्यथा युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
या आंदोलनात शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कृष्णात मोरे, सरपंच पती संजय माने, अनिल छत्रे, इरण्णा स्वने, ग्रामपंचायत सदस्य संजय अंगुले, युवासेना शहर प्रमुख विशाल साखरे, विशाल जाधव, नागनाथ किलजे, अप्पू मिरजे, राम जाधव, भीम काळे आदि शिवसैनिक, युवा सेना कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदवला.