अचलेर : जय गायकवाड
एमक्युएल फौंडेशन ही राज्यातील सर्वदुर मित्रांच्या व्हाट्स अपच्या माध्यमातून एकत्र आलेला समूह असुन या माध्यमातून विविध उपक्रमासह स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शन करणे, गरजू लोकांना आर्थिक मदत करणे असे उपक्रम या फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवले जातात.
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्रदिना निमित्ताने झूम अपच्या माध्यमातून काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या संमेलनामध्ये कवी दुशांत निमकर , सुनील पोटे , कवी प्राचार्य गणेश लोहे , जय गायकवाड यांनी बहारदार कवितांचे सादरीकरण करून ऑनलाईन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विविध विषयांवरील कविता सादर करून कधी खळाळून हसवले तर कधी अंतर्मुख व्हायला भाग पाडले तर कधी अलगद डोळ्यातून पाणी आले. असा हा रंगतदार अन् बहारदार कार्यक्रम दीड तास चालला सदरील कार्यक्रमाचा आनंद सर्वच सदस्यांनी लुटला.