काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे रविवार दि.(16) रोजी येथील नाभिक समाजाच्या वतीने समस्त नाभिक समाजाचे आराध्य दैवत संतशिरोमणी श्री.संतश्रेष्ठ सेना महाराज यांची पुण्यतिथी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरी करण्यात आली.
यावेळी प्रारंभी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुजित हंगरगेकर यांच्या हस्ते श्री.संतसेना महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत गाटे गल्ली भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम घेऊन दुपारी 12 वाजता गुलालाची व पुष्पांची मुक्त उधळण करण्यात आली.
यावेळी कृउबा समितीचे माजी संचालक सुजित हंगरगेकर, हभप सुनिल महाराज ढगे, शिवाजी ताटे, गणपत चिवरे, देविदास ढगे, शिवाजी चिवरे, बाळासाहेब भापकर, हनुमंत पांगे, अनंत चिवरे, नारायण लोहार, कल्याण गाटे, प्रशांत सुरवसे, भुजंग राऊत, पप्पु मगर, बापू राऊत, तुकाराम राऊत, मधुकर ताटे, बळी ताटे, बालाजी राऊत, कालिदास राऊत, पोहेकॉ धनंजय राऊत, रवि राऊत, अभिमान राऊत, तानाजी राऊत, अक्षय ताटे, बाळासाहेब ताटे, गणेश राऊत, पांडुरंग पांगे आदीसह महिला समस्त नाभिक समाज बांधव उपस्थितीत होती.