इटकळ, दि. 16 : राहते घर व भांडयाचे दुकान फोडून चोरट्यांनी 23 हजार रोख रक्कम, सोन्याचे दागिने व किंमती भांडे चोरुन नेल्याची घटना इटकळ ता. तुळजापूर येथे रविवारी पहाटेपूर्वी घडली. 

इटकळ येथील गणेश नगर मध्ये राहणारे कल्लया महादेव स्वामी यांचे घर व राष्ट्रीय महामार्गालगत फरीद मकानदार यांचे भांड्याचे दुकान चोरट्ंयानी फोडले. यात स्वामी यांचे दोन किंमती मोबाईल व कपडे व किचनची रुमच्या दाराची कोंडी उचकटुन कपाटामधील  रोख १९ हजार 300 रुपये व सोन्याचे नेकलेस, कर्ण फुले, २अंगट्या घेऊन चोरटे पसार झाले. तर राष्ट्रीय महामार्गावरील भांड्याचे दुकान फोडून रोख ४००० हजार रुपये,तांब्याची व पितळी भांडे चोरली. 

घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्यातचे सपोनि सुधीर मोटे, अमित मस्के व इटकळ औट पोस्ट पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी यांनी घटास्थळी जावुन पाहणी केली. याबाबत नळदुर्ग पोलीस ठाण्यात रविवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इटकळ ता. तुळजापूर येथे दोन चार महिन्याला चोरीच्या घटना घटत आहेत. परंतु अद्याप कुठल्याही चोरीची तपास लागला नाही.त्यामुळे नागरिकांत चोरीचे सत्र कधी बंद होईल यांची चिंता आहे.

 
Top