तुळजापुर : कुमार नाईकवाडी
तुळजापुर नगरपरिषद च्या वतीने ७३ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन कोरोना लढ्यात अथक परिश्रम घेतलेल्या कोरोना योद्धाचा सन्मान करुन न.प.कर्मचारी वर्गाचे मनोबल वाढविले. तुळजापुर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी व मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्या हस्ते नगर पालिका कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
प्रारंभी ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहुर्तावर नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी न.प. मुख्याधिकारी आशिष लोकरे, नगरसेवक अमर मगर, पंडितराव जगदाळे, विजय कदंले, विशाल रोचकरी, अभिजित कदम, नानासाहेब लोंढे आदीसह न.प. कर्मचारी उपस्थित होते. कोरोनावर यशस्वीपणे मात करणारे न.प. कर्मचारी, न.प.कार्यालयीन अधिक्षक वैभव पाठक, राहुल मिटकरी, दत्ता डोंगरे या कर्मचाऱ्यांना सन्मान पञ देवुन गौरवविण्यात आले.
तसेच संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगाला रोखण्यासाठी बाजीप्रभु सारखी खिंड लढवुन आपल्या जिवाची बाजी लावुन अथक परिश्रम घेतलेल्या जाँबाज खिलाडी असलेल्या न.प.कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्य दिनीच्या भव्य पुर्ण सोहळ्यात सन्मान करण्यात आला. तसेच दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपञ देवुन सत्कार करण्यात आला.