पाडोळी, दि. २० : 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार व राष्ट्रवादी ओबीसी सेलचे उस्मानाबाद तालुकाध्यक्ष तथा पत्रकार प्रशांत  सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुरुवार  दि. २० तर रोजी उस्मानाबाद तालुक्यातील टाकळ (बेंबळी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी इतर बाबीवर खर्च न करता सामाजिक भान राखत पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी "झाडे लावा झाडे जगवा" हा मंत्र जपत टाकळी येथील आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले.  


याप्रसंगी डॉ.  एस.एस.पवार, आरोग्य सहाय्यक अधिकारी आर.बी. वाघमारे, सुतार यु.एन. यांच्यासह गावातील  शिवशांत काकडे, अमोल सूर्यवंशी, श्रीधर नरवडे, नामदेव काकडे, गहिनीनाथ सोनटक्के, रोहित मदने, ज्ञानेश्वर सोनटक्के, आनंद कांबळे,  निखिल सूर्यवंशी, आनंद कांबळे,किशोर शेंद्रे मुक्तार पटेल, नेताजी काकडे,रोहित सुर्यवंशी यांच्यासह मित्रमंडळी  उपस्थित होते.

 
Top