उस्मानाबाद : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत सुरू असणाऱ्या मासिक पाळी व्यवस्थापन आणि गाव पातळीवर ती अस्मिता सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याचे उपक्रमात उस्मानाबाद रोटरी क्लब सक्रियपणे सहभागी होणार असल्याचे रोटरी क्लब उस्मानाबाद चे अध्यक्ष अमर देशमुख यांनी सांगितले.

 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक 15 ते 31 ऑगस्ट या कालावधीत ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तर्फे जागर अस्मिता हा उपक्रम राबवण्यात येत आहे यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक गावात महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मासिक पाळीच्या काळात गावपातळीवर सॅनिटरी पॅड उपलब्ध होण्याच्या दृष्टीने व्यापक अभियान राबवण्यात येत आहे.

   यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना स्मार्ट कार्डच्या माध्यमातून फक्त पाच रुपयांमध्ये सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले जात आहेत. या उपक्रमासाठी रोटरी क्लब उस्मानाबाद च्या वतीने अकराशे मुलींसाठी एक महिन्याचे पॅड चा खर्च रोटरी क्लब उस्मानाबाद ने उचलला आहे. भविष्यात या उपक्रमात व जनजागृती कार्यक्रम राबवण्यासाठी ही रोटरी क्लब उस्मानाबाद सक्रियपणे उमेद अभियान जिल्हा परिषद उस्मानाबाद  सोबत काम करणार असल्याचे  रोटरी क्लब उस्मानाबाद चे सचिव इंद्रजीत आखाडे यांनी सांगितले.

   जागर अस्मितेचा या माध्यमातून जिल्ह्यातील दीड लाख कुटुंबं पर्यंत गावस्तरावर  मासिक पाळी व्यवस्थापनाच्या दृष्टीने अस्मिता प्लस च्या माध्यमातून सॅनिटरी पॅड उपलब्ध करण्यासाठी अभियान राबवण्यात येत असून यामध्ये सामाजिक संस्था शासकीय विभाग व दातृत्व शील व्यक्तींनी योगदान द्यावे असे आवाहन उमेद अभियानाचे  जिल्हा कृतीसंगम समन्वयक गोरक्षनाथ भांगे यांनी केले

 
Top