नळदुर्ग, दि. 20 : अणदूर, ता. तुळजापूर येथे चोरट्यांची धुमाकुळ घालता असून गावातील विश्वनाथ परिसरात 17 राेजी चोरांनी घरातील जवळपास 1 लाख 82 हजार रुपयांच्या मुद्देमलावर डल्ला मारला आहे. दरम्यान गल्लीतील अनेक घरांचे कुलूप तोडून चापचा चापची केली आहे.
अणदूर गावात गावात मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ असलेल्या मेन रोड लगत असलेल्या सोन्याच्या दुकानांचे कुलूप, सेटर पट्टी तोडून मोठा डल्ला हानण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र याठिकाणी काही करता आले नाही त्यामुळे स्वामी यांचे किराणा दुकान फोडून काही रोखड घेवून चोरांनी पळ काढला.
पोलीस उपनिरीक्षक अमित मस्के,बीट अंमलदार संतोष सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद पोलीस दलातील श्वान पथकाने (दि.१८) रोजी सकाळी तपासणी केली मात्र चोरांचा मागोवा घेतला पण त्यांना अपयश आल्याचे दिसून आले.पोलीस निरीक्षक जगदीश राऊत हे पुढील तपास करत आहेत.