चिवरी : राजगुरू साखरे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यालय, महाविद्यालय, इंग्रजी मराठी माध्यमांच्या शाळा बंद आहेत. काही शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे त्यामुळे संबंधित शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. त्याचा त्रास पालकांसह विद्यार्थ्यांना होत आहे. कोरुणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शाळा बंद ठेवले आहेत. त्याला पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू केली आहे, त्यासाठी विद्यार्थी मंडळी, पालकाकडे अँड्रॉइड मोबाईल हट्ट धरीत आहेत. त्यामुळे पालकांच्या खिशाला झळ बसू लागल्याने त्यांची चिंता वाढली आहे.
ऑनलाईन शिक्षणासाठी 10 ते 12 हजाराचा अँड्रॉइड मोबाईल आवश्यक आहे. मात्र ग्रामीण भागात राहणारी गरीब मजूर, शेतकरी, कष्टकरी जनतेकडे एवढे पैसे नाहीत. रोज कामाला जाऊन पैसे मिळवणे व संसाराचा गाडा हाकणे हे काम चालू असते, मात्र या जुलै, आॅगस्ट महिन्यापासून शिक्षकांनी मुलांना मोबाईलवर शिकवायला सुरुवात केली व सर्वांनी मोबाईल घ्या अशा सूचना दिल्या. पण हे मोबाईल घ्यायला अनेक पालकाकडे पैसे नाहीत, हे विद्यार्थ्यांना व ऑनलाईन शिक्षकांना कशी सांगणार या चिंतेने पालक वर्ग ग्रासला आहे.
घरची गरीब परिस्थितीमुळे गरीब घरची ही हुशार मुलं हिरमुसली आहेत. महागडे मोबाईल विकत घेऊन न शकणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांसाठी त्या भागातील शिक्षकांनी आर्थिक परिस्थितीचे भान ठेवून यातून मार्ग काढून देणे गरजेचे आहे. कारण या कोरुना काळात मजुरीचे काम थोड्या प्रमाणात आहेत. पैसे कमवण्यासाठी गावा बाहेर पडता येत नाही, त्यामुळे मोबाईला रिचार्ज साठी पैसे नाहीत हे जाणणाऱ्या मुलांना शिक्षक समजावु शकतात,अन्यथा ही मुले रोज घरामध्ये चिडचिड करायला लागतात. याचा त्यांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो,यात एक मात्र खरे की आर्थिक परिस्थिती नाजूक असणार्या पालकांची या ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे ससेहोलपट होत आहे.कारण कोरोणा सारखा महाभयंकर रोग नात्यांची परीक्षा आणि गरिबाची चेष्टा करत असल्याचे ग्रामीण भागामध्ये बोलले जात आहे.