नळदुर्ग, दि. 19 : कोरोनामुळे तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे "एक गाव, एक गणपती" ही संकल्पना राबविण्याचा निर्धार शांतता कमिटीच्या बैठकीत करण्यात आला.

आगामी होवू घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदगाव ता. तुळजापूर येथे हुतामा स्मारकात मंगळवार रोजी शांतता कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीस पंचायत समितीचे सदस्य सिध्देश्वर कोरे, नळदुर्ग पोलीस स्टेशनचे पो.ना. एन.स. बांगर, माजी उपसरपंच गजानन मोरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील, सरंपच सौ. कलशेट्टी, शिवानंद शरणार्थी, यांच्यासह गावातील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत सर्वांच्या सर्वानुमते गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून गावातील श्री बसवेश्वर मंदीरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. 


 
Top