जळकोट, दि.१३ : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक रघुनाथ कागे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्रशालेच्या सहशिक्षिका पुष्पलता कांबळे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन चरित्रावर माहिती देताना म्हणाल्या की, अहिल्याबाई होळकर ह्या लढाऊ वृत्तीच्या होत्या. जलनीती ही त्यांची प्रेरणा आहे. प्रजेला सुखी करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहत असत. न्यायनिवाड्यासाठी त्यांनी कधीही कुचराई केली नाही. आजच्या स्त्रियांनी त्यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करून स्वतःला स्वयंपूर्ण बनवावे.

 यावेळी सरपंचपती संजय माने, युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख व ग्रामपंचायत सदस्य आशीष सोनटक्के, ग्रामपंचायत सदस्य संजय अंगुले, ग्रामपंचायत सदस्य दामोदर लोखंडे, पत्रकार व श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ, कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष मेघराज किलजे, दयानंद भोगे, माजी ग्रामपंचायत सदस्य पिंटू कागे, नवनाथ पाटील, खंडेराव भोगे, नागनाथ किलजे, अमोल ठोंबरे, नागया स्वामी, शिवाजी पालम पल्ले, अनिल पासोडे, विलास फुकटे, विशाल साखरे, राम जाधव आदीसह युवक, ग्रामस्थ उपस्थित होते

 
Top