तुळजापुर, दि. २१ : उस्मानाबाद जिल्ह्याची आंतरराष्ट्रीय खेळाडू, भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, तुळजापुर तालुका क्रीडा अधिकारी, सुवर्णकन्या कु.सारिका सुधाकर काळे यांना क्रीडा क्षेत्रातील मानाचा सर्वोच्च ''अर्जुन पुरस्कार'' नुकताच जाहीर झाला आहे.
सारिका काळे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तुळजापूर शिवसेना उपतालुकाप्रमुख रोहित नागनाथराव चव्हाण यांच्या वतीने कु. सारिका काळे यांचा शाल, फेटा व आई तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शामल वडणे पवार, शिवसेना शहरप्रमुख सुधीर कदम तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे, सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, हंगरगा शाखाप्रमुख शंकर गव्हाणे आदी उपस्थित होते.