तामलवाडी : सर्जेराव गायकवाड 

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असुन या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी व परीसरातील नागरीकांनी सतर्क रहावे असे आवाहन तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी तुळजापुर लाईव्हशी बोलताना केले आहे.

     देशासह राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असुन या विषाणुचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागामध्येही मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसुन येत आहे.तामलवाडी गाव हे सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील मोठे गाव असल्याने व गावामध्ये बॅंक,पोलिस स्टेशन,व शेतीसाठी व इतर गरजेच्या लागणार्या वस्तुची मोठी बाजारपेठ असल्याने परीसरातील अनेक गावच्या लोकांचा संपर्क येतो तसेच सोलापूर येथेही नागरीकांची ये - जा सुरूच असते त्यामुळे प्रत्येकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. सध्या तामलवाडी हे गाव जरी कोरोनामुक्त असले तरी परीसरातील काही गावामध्ये कोरोनाचे रूग्ण आढळत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तामलवाडी येथील किराणा दुकानदार,शेतकरी सेवा केंद्रे, सर्व दुकाने,होटेल,बॅंक मित्र,भाजी विक्रेते,कापड दुकानदार, वाहनचालक,फळविक्रेते यांनी प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून खबरदारी घ्यावी.काहीही काम नसताना अनेकजण दोनचाकीवर विनाकारण विनामास्क बाहेर फिरत आहेत अशांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच काहीजण मास्कचा वापर करताना दिसत नाहीत अशा लोकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सपोनि दत्तात्रय काळे यानी सांगितले. प्रत्येकांनी आपल्या व आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर सामाजिक अंतर ठेवुनच वागावे, नेहमी मास्कचा वापर करून दररोज हात साबणाने स्वच्छ धुवावेत,कामानिमित्त बाहेर पडल्यास विनाकारण कुठल्याही वस्तुला हात लावु नका, प्रशासनाने दिलेल्या अशा सर्व नियमांचे आपण काटेकोरपणे पालन केले तर आपण नक्कीच कोरोनापासुन दुर राहु व यामुळे  आपण,आपले कुटुंब व आपले गाव कायमस्वरूपी कोरोनामुक्त राहण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे सपोनि दत्तात्रय काळे यानी बोलताना सांगितले. तसेच तामलवाडी व परीसरातील नागरिकांनी या कोराना संसर्गापासुन आपला व आपल्या गावचा बचाव करण्यासाठी सतर्क रहावे असे आवाहनही सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे  यानी तुळजापुर लाईव्हशी बोलताना केले आहे.
 
Top