तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

बहीण भावाच्या अतुट नात्याचा रक्षाबंधन हा सण तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी व परीसरात दि. ३ ऑगस्ट रोजी साधेपणाने  साजरा करण्यात आला.

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळिते भाऊराया......म्हणत दि. ३ ऑगस्ट  रोजी बहीण भावाच्या प्रेमाचे अतुट नाते असणारा रक्षाबंधन हा सण तामलवाडी व परीसरात साधेपणाने साजरा करण्यात आला.सध्या कोरोनाचे सावट अधिक गडद होत असल्याने सर्वच धर्माच्या नागरीकाना अनेक मोठ मोठ्या सणाला मुकावे लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बंद असल्याने दरवर्षीप्रमाणे अनेक भाऊ- बहीणीला भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी भेटता येत नसले तरीही अनेकांनी मोबाईलच्या माध्यमातून या कोरोनापासुन आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे हीच आमच्यासाठी रक्षाबंधनाची ओवाळणी असल्याचे काही बहीणींनी भावाला सांगितले व शुभेच्छा दिल्या.तर काही ठिकाणी लहान चिमुकल्या बहीणींनी आपल्या लहान भावाच्या हातावर राखी बांधुन व साखर भरवुन भावाची ओवाळणी केली परंतु भावाकडुन मिळणार्या  भेटवस्तूसाठी हट्ट मात्र केलेला दिसला नाही.असा हा रक्षाबंधनाचा सण कोरोनाच्या सावटाखाली सगळीकडे साधेपणाने साजरा करण्यात आला.
 
Top