नळदुर्ग, दि. 03 : कोरोनाच्या पाश्वभूमीवर गेल्या मार्च महिन्यापासुन लॉकडाउन होते. सद्य परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यांच्या उदयोग, व्यापार, शेती, नोकरी वर मोठा आर्थिक परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीतही शिक्षण महत्वाचे आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करून नळदुर्ग येथील महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फ़ी माफ करावी व पालकाना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नळदुर्ग येथील बालाघाट महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा सचिव जोतिबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख़, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के, भाऊराज कांबळे आदि उपस्थित होते.
 
Top