नळदुर्ग, दि. 04 : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या संकटकाळात आनेक व्यक्ती, संस्था मदत करत आहेत. ग्रामीण कुटा फायनान्सीयल कंपनीनेही मदतीत खारीचा वाटा उचलत मदत केली आहे.

     ग्रामीण कुटा फायनान्सीयल सर्विस कंपनीच्या वतीने कोरोना योद्धा ठरलेल्या प्रशासनातील विविध घटकांप्रती आदर व्यक्त करत उस्मानाबाद, तुळजापूर, नळदुर्ग व अणदुर येथे सोमवार दि.३ आँगस्ट रोजी  मास्क व सँनिटायझरचे वाटप करण्यात आले.


  उस्मानाबाद पोलीस अधिक्षक कार्यालय येथे अतिरिक्त पोलीस अधिक्षक संदीप पालवे यांच्याकडे शंभर मास्क व सँनिटायझर सुपूर्द करण्यात आले. उस्मानाबाद तहसील कार्यालय येथे तहसीलदार गणेश माळी यांच्याकडे शंभर मास्क व सँनिटायझर सोपवण्यात आले. तुळजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणपत राठोड यांच्याकडे शंभर मास्क व सँनिटायझर देण्यात आले. तसेच नळदुर्ग येथील नगर पालिका कार्यालयात मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्याकडे शंभर मास्क व सँनिटायझर सोपवण्यात आले. कंपनीच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यातील आनेक भागात कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण कुटा फायनान्सीयल कंपनीकडून मदत देण्यात येत आहे. आशी माहिती कंपनीचे एरीया मँनेजर शारणप्पा गुजले यांनी दिली. यावेळी ब्रँन्च मँनेजर विनेश थोटे, गजानन पांचाळ व प्रविण कदम उपस्थित होते.


 
Top