उस्मानाबाद, दि. 04 : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर विधानसभेचे आमदार यांनी उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी गावास भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आ. पाटील यांनी अनेक विषयावर गावातील नागरिकांशी संवाद साधून धीर देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी दक्षता समितीने पहिल्या 01 या कोवीड रुग्णाच्या बिलाबाबत आ. पाटील यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याची मागणी केली. तसेच संपुर्ण गाव सिल न करता स्पेसीफीक एरीया सील करावा अशी मागणी केली.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काऴे, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे, नेताजी पाटील, पंचायत समीतीचे माजी सभापती बालाजी गावडे, नवाब पठाण, राजाभाऊ सोनटक्के, बाऴासाहेब माने, संतोष अगलावे, पोलिस स्टेशनचे सपोनि दिनकर गोरे, जगताप, तलाटी ढोके, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.