तुळजापूर, दि. 04 : श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त तुळजापूर येथे झुंजार हनुमान भजनी मंडळ व दिपक संघ यांच्यावतीने दि. 12 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मास्क वाटप, वृक्षारोपण व संपूर्ण सॅनिटायझर वाटप आदी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव दरवर्षी मोठया उत्साहाने साजरी करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव होणार नसून उस्मानाबाद जिल्हयात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्ट जन्माष्टमी निमित्त तुळजापूर येथील झुंजार हनुमान भजनी मंडळ व दिपक संघ यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात भव्य रक्तदान शिबीर, मास्क वाटप, वृक्षारोपण व संपूर्ण गल्लीत सॅनिटायझर करणे आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक नितीन रोचकरी, संजय पैलवान, खंडू जाधव यांनी दिली आहे.