काटी, दि. 17 : तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी विनायक हजारे वय (42) यांचे रविवार दि.(16) ऑगस्ट रोजी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. 

मंगरुळ येथील मनमिळाऊ व्यक्तीमत्व असलेले एक उत्तम व्यावसायिक व सतत सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका उमद्या युवकाच्या अचानक जाण्याने मंगरूळ येथील त्यांच्या कुटुंबीयांसह गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने मंगरुळसह परिसरातुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत रविवारी सकाळी मंगरूळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

 
Top