नळदुर्ग, दि. 16 : अंगणवाडीत शिकणा-या बालकांना सुगडीचे वाटप करण्याऐवजी कोरडा आहार देण्याची मागणी शिवसेनेचे नळदुर्ग शहरप्रमुख संतोष पुदाले यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, खासदार व संबंधित मंत्री यांना निवेदन पाठवून पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
नळदुर्ग शहरातील नगरपरिषद मार्फत असलेल्या अंगणवाडी व आसपास असलेल्या खेडेगावातील अंगणवाडी यांना पोषण आहार म्हणून सुगडी याचे वाटप होत आहे. याप्रकरणी नळदुर्ग शिवसेना शहरप्रमुख संतोष पुदाले यांनी आपली कंबर कसली असून लॉक डाउन च्या काळात गोर गरिबांच्या हाताला काम नसून त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. आशा परिस्थितीत अंगणवाडी येथे शिकणाऱ्या त्यांच्या मुलांना सुगडी चे वाटप न करता त्यांना कोरडा आहार देण्यात यावा (जसे गहू, डाळी ,तेल, हळद, मीठ) जेणेकरून विद्यार्थ्यांना व त्यांच्या पाल्यानं दैनंदीन जीवनातील या वस्तूची त्यांना उणीव भासू नये, याप्रकरणी संतोष पुदाले यांनी जिल्हाधिकारी, खासदार, व संबंधित खात्याचे मंत्री यांना निवेदन पाठवून या प्रकरणी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले आहे. शहरप्रमुख या नात्याने गावातील व आजूबाजूच्या अंगणवाडीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा या साठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचेही संतोष पुदाले यांनी यावेळी म्हटले आहे.