तुळजापूर : कुमार नाईकवाडी

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा वर्धापन दिन रविवार रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर जगदे यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत गाऊन विद्यापीठ ध्वजास मानवंदना देण्यात आली. यानंतर उपप्राचार्य प्रा. रवी मुदकना यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख ,प्राध्यापक, कर्मचारी व सुरक्षा रक्षक उपस्थित होते.

तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री तुळजाभवानी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. एस. एम मनेर यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी राष्ट्रगीत गाऊन मानवंदना देण्यात आली यावेळी मेजर डॉ.यशवंत डोके ,डॉ. गुंड पाटील ,प्रा. बाविस्कर, प्रा. अश्पाक आतार, प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

 
Top