तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे  येथील १०८ व १२४ भक्त निवास व उपजिल्हा रुग्नालयातील येथे क्वारटाईन झालेल्या नागरीकांना आनंद कदंले मिञ मंडळाच्या वतीने १० दिवस गणेश उत्सवा निम्मीत क्वारटाईन नागरिकांना गोड पदार्थ देऊन गणेश उत्सव साजरा करणार आहेत.

 दि. २२ शनिवार रोजी श्री गणेश उत्सवाचे पाहिल्या दिनाचे औच्युत साधुन आनंद कंदले मिञ मंडळाच्या वतीने तुळजापूर येथील भवानी रोड वरील श्री सुवर्णेश्वर गणपतीला लाडुचा प्रसाद दाखवुन  शहरातील 108 भक्त निवास, 124 भक्त निवास व ग्रामीण रुग्णालय येथील 300 नागरिकांना बुंदीचे लाडू देऊन सुरवात केली. 

   यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, डॉ होनमाने, आनंद कंदले,रत्नदीप भोसले, रणजित पाटील, राम जाधव, मिथुन पोफळे, अनिल पवार,  दादा भोरे, सुरज गायकवाड, कुणाला रोंगे, सुलेमान शेख, ओंकार इगवे,व आनंद दादा कंदले मित्र मंडळ सहकारी उपस्थिती होते.


 
Top