उस्मानाबाद, दि. 23 :
उस्मानाबाद जिल्हयात आज रविवार दि. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 208 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. 53 तसेच आज दिवसभरात 67 जण बरे होवून घरी परतले आहेत. दिलासादायक म्हणजे आज एकही मृत्यू नाही.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 4 हजार 630 झाली आहे. यातील 2 हजार 561 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 122 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 947 जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.