तुळजापुर : कुमार नाईकवाडी

"गणपती बप्पा मोरया" च्या जयघोषात श्री तिर्थ क्षेत्र तुळजापुरात दि. २२  रोजी पारंपरिक पद्धतीने श्री विघ्न हर्ता गणरायाचे भक्तीमय वातावरणात श्री गणेश भक्तांनी स्वागत केले.

संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगामुळे श्री गणेश उत्सवावर कोरोना चे सावट असल्यामुळे तुळजापुरात श्री गणरायाचे साध्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. कोरोनामुळे न.प. महसुल प्रशासनाच्या वतीने  येथील घाटशीळ रोडवरील कार पार्कींग या ठिकाणी सामाजिक अंतर पाळुन व्यापाऱ्यानी श्री गणेश मुर्ती विक्रीसाठी ठेवण्यात याव्यात असे आव्हान करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देतश्री गणेश मुर्ती विकणा-या व्यापाऱ्यानी येथील घाटशीळ रोडवरील कारपार्कींग व इतर व्यापाऱ्यानी आपली दुकाने अंतरावर मांडली होती. 

या ठिकाणी श्री गणेश मुर्ती आणि श्री गणेश मुर्ती साठी साहित्य खरेदी करण्यासाठी श्री गणेश भक्तानी गर्दी केली होती. शहरातील नागरीकांनी घरोघरी  श्री विघ्नहर्ता गणरायाचे मोठ्या भक्तीमय वातावरण बप्पा च्या जयघोषात स्वागत करुन प्रतिष्ठापणा करण्यात आली. 

शहरातील सार्वजनिक गणेश मंडळानाही अंत्यत साध्या पद्धतीने श्री विघ्नहर्ता गणरायाची प्रतिष्ठापणा करुन स्वागत केले. दर वर्षी श्री गणेश उत्सव ढोल ताश्याच्या गजरात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. माञ या वर्षी संसर्गजन्य कोरोना साथी च्या रोगामुळे श्री गणेश उत्सवावर कोरोना चे सावट दिसुन आले.

 
Top