बीड, दि. 1 :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी )चा निकाल दि.29 जुलै 2020 रोजी दुपारी  01 वाजता जाहीर करण्यात आला. यामध्ये केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील शाम विद्यालयानेचे परीक्षेसाठी एकूण 177 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी डिस्टिंक्शन मध्ये  39 विद्यार्थी ,फर्स्ट क्लास 76 विद्यार्थी ,सेकंड क्लास 47 विद्यार्थी, पास मध्ये चार विद्यार्थी अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे.  यामध्ये सेमी माध्यमात शेख इरफान रसुल 85 .60 एवढे गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला, ठोंबरे अशोक चंद्रसेन 84 .40 दुतिय क्रमांक मिळवला, तर हनुमंत बालासाहेब सासुरा 83 .80, कदम कृष्णा बंधू वाडी 83 .60,मुंडे स्वाती बाबुराव देवगाव 83 .40 ,ढाकणे शिवानी महादेव  83. 40 तर मराठी माध्यमातून प्रथम क्रमांक शाहेद सिकंदर दहिफळ 80.60 , दुतीय मोराळे महादेव कल्याण दहिफळ 79 .80 तर  पवार स्वप्निल रामलिंग येडशी 78.80 , ओंकार बाजीराव दहिफळ 77.40 , कुमारी पार्वती हरिदास ज्वाला 77 टक्के सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेचे नावलौकिक केले आहे.

 तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत गदळे , सचिव बाळुताई गदळे, उपाध्यक्ष शरद बप्पा गदळे,  मुख्याध्यापिका इप्पर मॅडम ,पंडित सर, भोसले सर, मुंडे सर , कुलकर्णी मँडम , डोईफोडे सर, पाखरे सर तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. संस्थेच्या व पालकांच्या वतीने शाळेचे अभिनंदन करण्यात आली.
 
Top