नळदुर्ग, दि. 16 : आर्थिक दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची कमतरता भासू नये म्हणून येथील आरंभ सामाजिक संस्थेचे श्रमिक पोतदार, सागरसिंह हजारे, आयुब शेख या पदाधिका-यांच्या वाढदिवसाचे खर्च टाळून गरीब व गरजू विद्यार्थाना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा निर्णय म्हणून आरंभ संस्था सचिव श्रमिक पोतदार यांनी घेतला होता.
त्यानुसार अंजनी प्रशाला नळदुर्ग येथील भाग्यलक्ष्मी लक्ष्मीकांत आकुसखाने ई. 10 वी, सारिका लक्ष्मण निर्मळे ई. 10 वी, अंबिका बालाजी ठाकूर 8 वी, जिप प्रशाला माऊली नगर अजय पप्पू कांबळे 9 वी, मुजावर आसेफा चाँद 10 वी, नॅशनल माध्यमिक मराठी शाळा कांबळे अभिषेक मलकप्पा इ. 10 वी, शेख सानिया शफिक इ.10वी, जि प कन्या प्रशाला नळदुर्ग शिवानी बालाजी शिंदे 8 वी, कु. शेख महेक अजमोदिदन ई.8 वी या एकूण 10 अत्यंत गरीब विद्यार्थ्यांचं वर्षभरातील संपूर्ण शैक्षणीक मदत करण्यात येणार आहे.
संस्थेच्या माध्यमातून गतवर्षी ही शिक्षणासाठी दत्तक घेतलेले सर्व विद्यार्थी विशेष गुणासह उत्तीर्ण झालेले आहेत. हीच परंपरा पुढे ठेवत संस्थेच्या वतीने शिक्षणासाठी दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना आज स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून शिक्षक जितेंद्र मोरखंडीकर, दौलतराव खाटमोडे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार, कोषाध्यक्ष सागर हजारे, प्रसिद्धी प्रमुख आयुब शेख, पप्पू पाटील, प्रशांत जोशी, कैलास घाटे, सुजय बिस्वास आदी उपस्थित होते.