उस्मानाबाद, दि. 11 : जिल्हयात मंगळवार दि. 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत आणखी 115 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात दोन जणांची मृत्यू झाला आहे. आता जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 759 वर पोहचली असून आतापर्यंत 69 जणांची कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 33 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 1 हजार 657 जणांवर उपचार सुरु आहेत.
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे एकूण 224 स्वॅब पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच जिल्हयातील रॅपिड ॲटिजेन चाचणीचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.