तुळजापूर, दि. 11 : रोटरी क्लब तुळजापूर चा पदग्रहण समारंभ नुकतेच अगदी साध्या पद्धतीने गोपाळ नगर येथील रोटरी हॉलमध्ये संपन्न झाला.
रोटरी क्लब ऑफ तुळजापूरच्या सन 2020-21 मधील नूतन अध्यक्षा ॲड. स्वाती नळेगावकर यांनी मावळते अध्यक्ष सचिन शिंदे यांचे कडून पदभार स्वीकारला. नूतन अध्यक्ष ॲड. स्वाती नळेगावकर यांनी वर्षभर ज्यांच्यासोबत त्यांना काम करायचे आहे ती त्यांची टीम बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची ओळख करून त्यांना पुष्प देऊन सन्मानित केले. तसेच त्यांचे नवीन वर्ष चालू झाल्या पासून आज पर्यंत त्यांनी क्लबने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. 2 महिन्यात रोटरी क्लब तुळजापूरने त्यांच्या अध्यक्षतेखाली 170 झाडांचे वृक्ष रोपण केले असून झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन घेऊनच त्यांनी हे काम केले आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन कार्यक्रमवर भर दिला. बदलत्या परिस्थितीत शिक्षकासाठी नवीन तंत्रज्ञानाशी ओळख मैत्री आणि मोबाईल वरून विद्यार्थ्यांना कसे शिकवता येईल, त्यास उपयुक्त असलेला 7 दिवसांचा आयटी स्किल प्रोग्राम घेतला. याचा फायदा जवळजवळ 800 ते 900 जणांना मिळाला. असे बरेच उपयुक्त कार्यक्रम घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चालू वर्षात जेष्ठ व्यक्ती साठी मोफत मोतीबिंदू शिबिर, शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती साठी तज्ज्ञ कडून मार्गदर्शन शिबीर, ब्लड डोनेशन कॅम्प, महिला सक्षमीकरण कारणसाठी शिलाई मशीन वाटप व शिवण काम प्रशिक्षण शिबीर,युवकान साठी Mpsc UPSC चे मार्गदर्शन पर शिबिर, युवकांसाठी मोफत कायदेविषयक शिबिर, शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स ची सोय उपलब्ध करून देणे आणि त्याच बरोबर डिसपोस मशीन देणे असे समाजास उपयुक्त कार्यक्रम त्यांच्या टीम सोबत राबवण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी व्यक्त केले
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पीडीजीचे विष्णू मोंढे हे उपस्थित होते. या प्रसंगी यावर्षी चे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सर्व रोटरीयन्स उपस्थित होते. या वेळी नवीन मेंबर्सना आमंत्रित करून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.