नळदुर्ग, दि. 17 : महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्यावतीने इटकळ ता. तुळजापूर येथील जि.प. शाळेतील सहशिक्षिका संगिता घुगे यांना गुरुवारी संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष काशिनाथ भालके, जिल्हा नेते भिमाशंकर जमदार,केंद्रप्रमुख नामदेव सोमवंशी, मुख्याध्यापक तानाजी गायकवाड, सहशिक्षक गणपती खोत, नीलम कांबळे, सुजाता चोथे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.


