नळदुर्ग, दि. 17 : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ऐतिहासिक लढयाचा मूक साक्षीदार असलेल्या नळदुर्ग येथील आलियाबाद पूलाचे गुरुवार (दि. 17) रोजी पूजन करण्यात आले..
येथील नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या वतीने गेल्या २२ वर्षापासून या पूलाच्या पूजनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी आलियाबाद पूलाचे पुजन माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक नितिन कासार, नगरसेवक बसवराज धरणे, विनायक अहंकारी, माजी नगरसेवक संजय बताले, पत्रकार विलास येडगे, भाजपाचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके, डॉ. आंबेडकर इंग्लीश स्कुलचे अध्यक्ष मारुती खारवे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सूहास येडगे, सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावर्षी पूलावरुन पाणी वाहात असल्याने मान्यवरांनी भर पाण्यात जावून पूजा केली. सर्व मान्यवरांचे विनायक अहंकारी यांनी आभार मानले.

