उस्मानाबाद, दि. 21 : उस्मानाबाद जिल्हयात आज सोमवार दि. 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 114 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 159 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 10 हजार 392 झाली आहे. यातील 7 हजार 625 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 307 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 760 जणांवर उपचार सुरु आहे.
