तुळजापूर : कुमार नाईकवाडी

 तालुक्यातील काक्रंबा येथील बाबुराव संभाजी साबळे हे गेली काही दिवसा पासुन पायाला दुखापत झाल्याने आजारी पडले होते. त्यामुळे ते घरात एका ठिकाणी पडुन होते. त्यांच्या उपचारासाठी लागणारी गोळ्या औषध आणण्यासाठी उस्मानाबादला गेलेल्या लहान भावाचे अपघाती निधन झाल्याचे समजताच आजाराने भावाने प्राण सोडल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. १९ रोजी राञी घडली. सख्या दोन भावडांवर एकाच चितेवर अत्यंसंस्कार  करण्यात आल्याने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे .

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील संभाजी साबळे यांचा मोठा मुलगा बाबुराव संभाजी साबळे वय ४५ वर्षे यांच्या पाया दुखापत झाल्याने जखम पसरून पाय  पूर्णपणे निकामी झाला होता. याच अल्पशा आजाराने ते गेली चार पाच महिन्या पासुन अंथरुणात पडुन  होते. त्यांच्या उपचारावरील औषधा  गोळ्या आणण्यासाठी त्यांचे शनिवार दि १९ रोजी सायंकाळी उशिरा लहान भाऊ युवराज संभाजी साबळे वय ४३ वर्षे हे उस्मानाबाद ला दुचाकीवर गेले होते. गोळ्या घेऊन गावाकडे येत असताना बावी येथील अश्रम शाळे नजीक येताच उडाण पुलावर  पाठीमागुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने गंभीर रित्या जखमी होवून जागीर ठार झाल्ये. सदरील घटनेची माहिती घरात आजारी असलेल्या भावाच्या कानी पडताच भावाच्या मूत्यू च्या धक्याने त्यांनी हि प्राण सोडले आहेत

त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुले, मुली असा परिवार असुन त्यांच्या या दुःखद निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.


 
Top