तुळजापुर : कुमार नाईकवाडी

संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महसुल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग व न.प.प्रशासनाची दि.२० रविवारी सायंकाळी जनता कर्फ्यु ची बैठक होवून दि. 23 ते 30 सप्टेंबर या कालावधीत जनता कर्फ्यु करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोमवार दि. २१ रोजी तुळजापुरात येथील आठवडा बाजार व दिपक चौक येथे नागरिकांची भाजीपाला खरेदी करण्यासाठी एकच‍ झुंबड उडाली होती.

शहरातील आठवडा बाजार व दिपक चौक येथे भाज्यांच्या भाव कडाडला होता. अलीकडच्या शेतकऱ्यांकडून भाजीपाला कमी दराने खरेदी करुन चढ्या दराने भाजी विक्री करण्याचा घाट व्यापारी मंडळाकडुन केला जात असल्याची चर्चा होत आहे. जनता कर्फ्यु काळात भाजी विक्रेत्या मध्ये प्रचंड वाढ झाल्याने अवाच्या सव्वा रक्कम घेऊन चढ्या दराने भाजी विक्री करुन व्यापारी वर्ग नागरीकांची लुटमार करुन करीत असल्याचे दिसुन येत आहे. व्यापारी आपल्या मनमानी पद्धतीने भाजी विक्री करीत आहेत. याचा सर्व सामान्य लोकांना याचा नाहक त्रास होत आहे. न.प.प्रशासनानी व्यापारी वर्गावर आळा बसविण्याची गरज आहे, अशी मागणी  नागरीकातुन केली जात आहे.

तसेच शहरातील बाजारपेठा मध्ये किराणा मालासह इतर वस्तु खरेदीसाठी नागरीकांची मोठी गर्दी झाली होती. रस्त्यावर दुचाकी, चार चाकी वाहनाची मोठी गर्दी झाली होती. आठ दिवस जनता कर्फ्यु असल्याने आपल्या कुंटुबाचा प्रंपचाचा गाडा हाकण्यासाठी बाजारपेठामध्ये नागरीकांची गर्दी दिसूत येत होती. संसर्गजन्य कोरोना मुळे गेल्या सहा माहिन्यापासुन श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर बंद असल्यामुळे शहराचे संपुर्ण अर्थकारण बिघडले आहे. त्यामुळे अनेक सामान्य लोकांचे, छोट्या, मोठ्या व्यापारी वर्गाचे मोठे हाल होत आहेत. सामान्य लोकांना एक वेळ खायचे व एक वेळ उपाशी बसायचे अशी जिवनाची घालमेल होत आहे. 

सतत लॉकडाऊन, सतत जनता कर्फ्युला जनता वैतागली आहे. जगावे की मरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात कोणतेही उद्योग क्षेत्र नसल्यामुळे बेरारोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे, अशा प्रतिक्रिया नागरीकातुन येत आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून  नागरीकांचा या जनता कर्फ्यु ला विरोध होत असल्याचे दिसुन येत आहे.

 
Top