नळदुर्ग, दि. 21 : तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे "माझे कुटूंब माझी जबाबदारी" या मोहिमेचा शुभारंभ सोमवार दि. 21 सप्टेंबर रोजी न करण्यात आला.
वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता माझे कुटूंब माझी जबाबदारी अंतर्गत घरोघरी तपासणी करण्यात येणार असल्यामुळे कोरोना बधितांना वेळेत उपचार मिळवून देणे शक्य होईल . तसेच नागरिक व रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासकीय यंत्रणा अहोरात्र झटत आहे. नागरिकांनीही मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आदी खबरदारी घेवून कोरोनाला आळा घालावा, असे आवाहन करण्यात येत आहे. दि. 21 पासून तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे. रोज 50 घरोघरी सर्वेक्षण करुन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. याकामी डॉ. मोकाशे, डॉ. गायकवाड, डॉ. जगताप यासह गावातील आशा कार्यकत्या, ग्रामपंचायत कर्मचारी परिश्रम घेत आहे.
