उस्मानाबाद, दि.21 : आज दि.21 सप्टेंबर 2020 रोजी मा. जिल्हा‍धिकारी  कौस्तुभ दिवेगावकर यांनी सर्व नगराध्यक्ष व सर्व  पंचायत समिती  सभापती  यांची  VC व्दारे Corona उपाययोजना व माझे कुटुंब माझी जबाबदारी  या योजनेची आढावा बैठक घेतली त्यानुसार वैद्यकीय औषधे दुकाने 24 तास  सुरू राहतील व इतर सर्व आस्थापना  दुकाने 09 ते 05 या वेळेत सुरू राहतील,पार्सल सेवा पुर्वी प्रमाणेच रात्री 10.00 वाजेपर्यंत राहील, जिल्हयात वेगवेगळया वेळा असु नयेत जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र  राज्य शासनाचे आदेशा  व्यतिरिक्त लॉकडाऊनबाबत कोणताही  आदेश  जारी केलेला नाही त्यामुळे लॉकडाऊन बाबत  कोणतीही अफवा पसरू नये अन्यथा संबंधितावर कारवाई  करण्यात येईल. 

मास्क न वापरल्यास 1 हजार रुपये दंड आकारले जाईल. या व्यतिरिक्त स्थानिक पातळीवर नगराध्यक्ष किंवा पंचायत समिती सभापती यांनी आवश्यकता वाटल्यास लोकांना  बरोबर घेऊन जनता कर्फ्युबाबत निर्णय घ्यावा. बीडीओ, तहसिलदार व मुख्याधिकारी यांनी  माझे कुटुंब माझी जबाबदारी  मोहिमेबाबत गतीने  कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्‍या.  

 
Top