तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाचा एस टी प्रवार्गात समाविष्टमध्ये समाविष्ट करण्याचा मागणीसाठी मल्हार आर्मी धनगर समाज बांधवाच्यावतीने श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दरबातुन सोमवार दि. २१ रोजी ज्योत पेटवून आंदोलनाचे रणसिंग फुकले. ही पेटवलेली ज्योत जो पर्यत धनगर समाजाला एस. टी. आरक्षण मिळत नाही तो पर्यत ज्योत प्रज्वलीत ठेवली जाणार आहे. ही प्रज्वलीत ज्योत महाराष्ट्र भर फिरवून आरक्षणासाठी जनजागृती केली जाणार आहे.
यापुढे संपुर्ण महाराष्ट्र भर धनगर एस.टी.आरक्षणासाठी सरकारच्या विरोधात आंदोलने केली जाणार आहेत. याची सुरुवात श्री आई तुळजाभवानी मातेच्या नगरीतुन करण्यात आली. मल्हार आर्मीचे संस्थापक अध्यक्ष सुर्यकांत कांबळे व बाळासाहेब बंडगर यांच्या नेतृत्वाखाली ज्योत पेटवुन आंदोलन पार पडले. या वेळी मल्हार आर्मीचे सचिव गणपत देवकाते, प्रदेश अध्यक्ष काकासाहेब मारकड, जिल्हा संपर्क प्रमुख आण्णासाहेब बंडगर, जिल्हाध्यक्ष निळंकठ कोपणवार, समर्थ पैहलवान, प्रमोद दाणे, प्रशांत गवडे, वैभव लकडे, आदित्य पैहलवान, शहाजी हक्के, समाधान पडवळकर, आर्जुन झाडे, चैतन्य बंडगर आदीसह धनगर समाज बांधव उपस्थित होते.
धनगर समाज बांधवाच्या मागण्या
धनगर समाज एस.टी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरीत करावी, धनगर समाजाच्या विकासाठी घोषित केलेल्या २२ योजनाची अंमलबजावणी करुन त्यासाठी १००० कोटी रुपयाची तरतुद ताबडतोब करावी, मेंढपाळावर होणारे हल्ले रोखण्यासाठी त्वरीत कडक कायदा करुन त्याची अमलबजावनी करावी, मेंढपाळाना संरक्षणासाठी मोफत शस्ञ परवाने द्यावे व मेंढपाळाची जणगणना करुन त्यांना आरोग्य कवच द्यावे, बेरोजगार युवक, युवतीना मोफत पोलीस व लष्कर भरतीसाठी प्रशिक्षण देण्यात यावे, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेतील जाचक निकष बदलण्यात यावे, धनगर समाजाची शैक्षणिक परस्थिती बघता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधण्यात यावे. तसेच स्पर्धा परिक्षा चा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना सारथी संस्थे प्रमाणे स्वतंत्र स्थापन करण्यात यावी. गेल्या ७० वर्षा पासुन धनगर समाज हा शांततेच्या मार्गाने धनगर एस.टी.आरक्षणासाठी मागणी करीत आहे परंतु प्रत्येक राजकीय पक्ष समाजाच्या तोडांला पाने पुसण्याचे काम करीत आहे या फसवणूकी मुळे धनगर समाज या पुढे स्वत बसणार नाही.स्वातंत्र्य मिळाल्यापासुन ७० वर्षा नतंर ही धनगर समाजास विकासाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट नाही केंद्र व राज्य सरकारनी वेळोवेळी आश्वासने देऊन या धनगर समाजाला एस.टी.आरक्षणा पासुन वंचित ठेवले आहे सरकारने धनगर समाजास न्याय न दिल्यास कार्यकर्ते मंञ्याच्या गाड्या पेटवतील, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

