उस्मानाबाद, दि. 07 : उस्मानाबाद जिल्हयात आज सोमवार दि. 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 169 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर गेल्या 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 80 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 7 हजार 159 झाली आहे. यातील 4 हजार 500 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 215 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 444 जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.





