इटकळ, दि. 07 : बाभळगाव ता. तुळजापूर येथील वैष्णोदेवी फुड प्रॉडक्टस प्रा.लि., कंपनीच्या मालमत्तेची सोमवारी जाहीर लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात आली. मात्र लिलाव प्रक्रियेमध्ये कोणीही सहभाग न घेतल्याने हा लिलाव होऊ शकला नाही. पुढील आदेशाने लिलाव पुन्हा घेतला जाईल, असे तहसिलदार सौदागर तांदळे यांनी जाहीर केले. 

बाभळगाव ता. तुळजापूर शिवारातील वैष्णोदेवी फुड प्रॉडक्टस प्रा.लि., या कंपनीचे समीर गोविंदलाल काकाणी, विजय विश्वनाथ मुळे, श्रीकांत हरिभाऊ जोशी यांच्याकडून महाराष्ट्र जमीन‍ अधिनियम १९६६नुसार येणे असलेल्या ३४कोटी ५८लाख २६हजार ७२१ रुपये देण्यात कसूर केला आहे. त्यामुळे स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. यामध्ये विक्रीसाठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी पुर्वोक्त रक्कम देण्यात आली नाही. मालमत्ता वैष्णोदेवी कंपनी बाभळगाव येथे सोमवार दि. ७सप्टेंबर रोजी सकाळी ११वाजता जाहीर लिलावाद्वारे विकण्यात प्रक्रीया सुरू आली.

प्रथम ज्याचे व्यक्तीगत,दुध संघ,अश्या विविध लोकांचे कंपनी कडून येणे असणार्यांचे तक्रारी अर्ज घेण्यात आले.जवळपास २५तक्रारी अर्ज आले.त्यानंतर लिलावात भाग घेण्यासाठी आलेल्या व्यक्ती,समुह,संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले.यासाठी तीस मिनिटांचा वेळ देण्यात आला.यावेळेत एक ही अर्ज आला नाही.त्यामुळे पुढील आदेशाने लिलावाची तारीख जाहीर केली जाईल असे जाहीर करण्यात आले. 

या लिलाव प्रक्रियेसाठी तहसीलदार सौदागर तांदळे, मंडल अधिकारी एम. यु. दुरुगकर, एल. यु. शिंदे,  इटकळचे तलाठी देशमुख, अशोक भातभांगे आदीजण उपस्थित होते.


 
Top