तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

शहरात गेल्या सहा माहिन्यापासुन संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतत लॉकडाऊन मुळे व्यापार उद्योग क्षेत्रात मोठी हानी निर्माण झाल्यामुळे मार्च ते सप्टेंबर पर्यतची नागरीकांची घर पट्टी व नळपट्टी माफ करावी, अशा प्रकारचे एक लेखी निवेदन सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तुळजापुर नगर परिष चे कार्यालयीन अधिक्षक वैभव पाठक यांच्याकडे देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा माहिन्यापासुन सतत लॉकडाऊन मुळे श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर बंद असल्यामुळे शहरातील सर्व व्यापारी, कष्टकरी नागरीक, पुजारी बाधंव, छोटे मोठे उद्योग धंदे करणारे व्यापारी यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. आर्थिक स्तोञ बंद पडल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी तुळजापुर नगर परिषदने सहा माहिन्याची घरपट्टी, नळपट्टी माफ कररुन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.. 

या निवेदनावर छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश रोचकरी, जिल्हा उपाध्यक्ष विजय माने, शहर अध्यक्ष आण्णासाहेब इंगळे, ऋषीकेश शिंदे, गणेश जाधव, राहुल साळवे, महेश शेळके आदींच्या स्वाक्ष-या आहेत.


 
Top