तुळजापूर : कुमार नाईकवाडी

तुळजापूर तालुका नाभिक समाजाच्या वतीने समाजाच्या विविध मागण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार तुळजापूर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, लॉकडाऊन कालावधीमध्ये आत्महत्या करणाऱ्या नाभिक बांधवाच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत देण्यात यावी, 26 मार्च 1979 राज्य शासनाच्या केंद्र शासनाला शिफारशी नुसार जातीचा समावेश एस.सी. जाती प्रवर्गातून करण्यात यावे, लॉकडाऊन कालावधीपासून प्रत्येक दुकानदारास व कारागीरास दहा हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे, तसेच संरक्षण विमा पन्नास लाख रुपये देण्यात यावा, लॉकडाऊन कालावधीमध्ये वीज बिल माफ करण्यात यावे, सलून व्यावसायिकाना संपूर्ण काम करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी  तालुकाध्यक्ष सुनील घागरे, शिवाजी सुरवसे ,बाबा घागरे आदीजण उपस्थित होते.

 
Top