तुळजापुर : कुमार नाईकवाडी
तुळजापुर शहरासह तालुक्यात रविवारी सायंकाळी विजेच्या कडकड्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या शेतातील सोयाबीन आदीसह पिकाला दिलासा मिळाला आहे.
रविवारी सायंकाळी चांगला पाऊस झाल्याने शहरासह तालुक्यात छोटे मोठे तळे पाण्याने साचले होते. तसेच शहरातील नाल्या ओसांडुन वाहिल्या. रस्त्यावर पावसाचे पाणी जोर जोराने वाहत होते. शहरात अनेक भागात पाऊसाच्या पाण्याचे डबके झाले होते. शहराच्या हद्दवाढ भागात माञ पाऊसाचे पाणी साचल्याने त्या ठिकाणी मोठी चिखलाची दल दल झाली होती. त्यामुळे नागरीकांना रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे मोठे हाल सोसावे लागले. तरी न.प. मार्फत हद्द वाढ भागातील रस्ते व्यवस्थित करावी, अशी मागणी नागरीकांतुन होत आहे.
