शिराढोण, दि. 7 : स्वयंपाक चांगला येत नसल्याच्या कारणावरुन मनिषा नरहरी सावंत, रा. खामसवाडी, ता. कळंब यांना पती- नरहरी भुजंग सावंत यांसह लक्ष्मी सावंत, भुजंग सावंत, रविंद्र सावंत या चौघांनी दि. 01.09.2020 रोजी 16.30 वा. सु. राहत्या घरी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच मनिषा यांची 3 वर्षीय मुलगी- सृष्टी हिस मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या मनिषा यांनी दि. 06.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : स्मशान भुमीत लावलेल्या वाहनांचा व टाकलेल्या कचऱ्याचा जाब मोद्दीन मेहबुब फकीर, रा. हमीदनगर, उमरगा यांनी गल्लीतील झुल्फेकर अजगर अली शेख यांना दि. 03.09.2020 रोजी 21.00 वा. सु. विचारला. यावर चिडून जाउन झुल्फेकर शेख यांनी  मोद्दीन फकीर यांना शिवीगाळ करुन लाकडी दांडा डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. वडीलांस वाचवण्यास आलेल्या अब्दुल फकीर यासही झुल्फेकर शेख यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मोद्दीन फकीर यांनी दि. 06.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top