उस्मानाबाद, दि. 24 : उस्मानाबाद जिल्हयात आज गुरूवार दि. 24 सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 263 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 263 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 50 झाली आहे. यातील 8 हजार 21 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 331 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 682 जणांवर उपचार सुरु आहे.






