उस्मानाबाद, दि. 18 : उस्मानाबाद जिल्हयात आज शुक्रवार दि. 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 275 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 86 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 9 हजार 846 झाली आहे. यातील 6 हजार 957 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 273 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 616 जणांवर उपचार सुरु आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.66 टक्के एवढे झाले आहे. तर सध्या जिल्ह्यातील मृत्यू दर 2.77 टक्के एवढा आहे. तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 51 हजार 833 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 9846 नमुने पॉजिटीव्ह आले आहेत. सध्या जिल्ह्यात 8 हजार 310 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 1 हजार 37 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.