नळदुर्ग, दि. 18 : तुळजापुर तालुक्यातील शेतक-यांना सवलतीच्या दरात ताडपत्री, स्प्रिंक्लर सेट, पाणबुडी पंप आदी शेतीविषयक साहित्य राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद गटनेते तथा नंदगाव जि.प. गटाचे सदस्य महेंद्र धुरगुडे यांच्यावतीने देण्यात येणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

यामध्ये दर्जेदार ताडपञी साईज 20×30 किंमत 1400 रु, 18×30 किंमत 1300 रु, 27×38 किंमत        2600 रु, 18×24 किंमत 1000 रु, 24×30 किंमत 1700 रु, 30×30 किंमत 2000 रु, 30×40       किंमत 2800 रु, 40×40 किंमत 3600 रु, तसेच पाणबुडी पंप 5HP - 10,100 रु, पाणबुडी पंप 3HP - 9,100, पाणबुडी पंप 7.5HP - 16,100 रुपये, तर स्पिक्लर सेट  - 8 नौजल 30 पाईप  - 15000 रुपये दरात देण्यात येणार आहे. 

सदरील साहित्य मंगरुळ ता. तुळजापूर येथील सन ॲन्ड ओशन कंपनी या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले असून शेतकऱ्यांनी येताना आधार कार्ड झेरॉक्स घेऊन यावे, तसेच सामाजिक अंतर पाळावे, गर्दी करु नये व मास्कचा वापर करावा, असे आवाहन महेंद्र धुरगुडे यांनी केले आले आहे. 


 
Top