ताज्या घडामोडी

 


काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून गुरुवार दि. 17 सप्टेंबर रोजी नवउद्योजक रामहरी मारुती लोंढे यांच्या कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर अंतर्गत माऊलीज फुड प्रोसेसिंग अॅन्ड ट्रेडिंग प्रा. लिमिटेड या नावाने येथील बसस्थानक शेजारी आडत दुकानाचा सर्व सामान्य शेतकरी महादेव अंधारे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीतशानदार उद्धघाटन सोहळा संपन्न झाला. 

काटीसह परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री करण्यासाठी वैराग, बार्शी, सोलापूर आदी ठिकाणी जावे लागत असे परंतु काटी सारख्या ग्रामीण भागात नव उद्योजक रामहरी लोंढे यांनी सुरू केलेल्या आडत दुकानामुळे आपल्या मालाची विक्रीची सोय गावातच झाल्याने वहातूक खर्चासह अन्य खर्च वाचणार असल्याने काटीसह परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.  या नव्याने सुरु करण्यात आलेल्या याआडत दुकानातून सोयाबीन, तुर, मुग, उडीद,ज्वारी, गहू, चिंच आदी धान्याची खरेदी केली जाणार आहे.

या उद्धघाटन प्रसंगी सरपंच आदेश कोळी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, नव उद्योजक रामहरी लोंढे, अशोक जाधव, करीम बेग,  ग्रा.प. सदस्य अनिल बनसोडे, सुहास साळुंके, महादेव अंधारे, सुमित लोंढे, अभिषेक शिंदे, संतोष डोलारे, गणेश क्षिरसागर, हेमंत डेंगळे, सुरज जाधव बाळु काटे आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top