नळदुर्ग : एस.के. गायकवाड
वंचित बहुजन आघाडी तुळजापूर कार्यालयात सुर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव भिमराव आंबेडकर यांना 77 व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले.
गुरूवारी वंचित बहुजन आघाडी, मध्यवर्ती कार्यालय तुळजापूर येथे सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना 77 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका सरचिटणीस व कास्ट्राईब संघटनेचे विभागीय अध्यक्ष दत्ता माने यांच्या हस्ते सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना आभिवादनव करण्यात आले.
या प्रसंगी भैय्यासाहेब आंबेडकरांच्या कार्याची विस्तृत चर्चा करण्यात आली. चैत्यभूमी निर्मितीत त्यांचे योगदान, बोध्द धम्माच्या प्रसार व प्रचारासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, बाबासाहेबांच्या पश्चात आंबेडकरी चळवळ प्रभावी पणे चालवण्यासाठी अत्यंत कठीण परिस्थितीतून वाट काढणारे भैयासाहेब आंबेडकर इत्यादी विषयांवर चर्चा झाली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद रोकडे , भारतीय बौध्द महासभेचे तुळजापूर तालुकाध्यक्ष देविदास कदम, सरचिटणीस सुकेशन ढेपे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका नेते जीवन कदम, वंचित चे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा उस्मानाबाद जिल्हा सलून व पार्लर असो. चे अध्यक्ष सुरेश चौधरी आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुकेशन ढेपे यांनी तर आभार जीवन कदम यांनी मानले.