तुळजापूर, दि. 18 : तालुक्यातील आरळी बुद्रुक व बिजनवाडी ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विस्ताराधिकारी (शिक्षण) डॉ. वाय.के. चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दि. 15 सप्टेंबर रोजी वाय.के. चव्हाण यांनी आरळी व बिजनवाडी ग्रामपंचायतीचा पदभार स्विकारला. यावेळी आरळी बु चे ग्रामसेवक हमीद पठाण, मकरंद बामणकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष्ज्ञ किरण व्हरकट, माजी सरपंच, सुनिल पारवे आदीजण उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.