उस्मानाबाद : महेश पाटील

कांदा निर्यात बंदीबाबतचा निर्णय तात्काळ मागे घेवून शेतक-यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसने शुक्रवार दि. 18 रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी गळ्यात कांद्याच्या माळा घालून काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. 

देशातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते.  चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्यांना होती, पण केंद्रातील जुलमी मोदी सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. या निर्यातबंदीमुळे कांद्याचे भाव पडून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने शुक्रवार, दि.18 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण  सरडे,कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सत्तार शेख, प्रशांत पाटील, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, माजी शहराध्यक्ष हरिभाऊ शेळके, धनंजय राऊत, कार्याध्यक्ष अलीम  शेख, तुळजापूर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सलमान शेख, राजाभाऊ नळेगावकर, विधी विभागाचे विश्वजित शिंदे, राहुल लोखंडे, अतुल देशमुख, संजय गजधने, प्रेम सपकाळ, विद्यार्थी काँग्रेसचे सौरव गायकवाड, कफिल सय्यद, अतिफ शेख, समाधान घाटशिळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top